पर स्त्रीला ही माता/बहिणी समान मानाले, म्हणजे यौन उत्पिडनासारखे दुर्दैवी कृत्य एखाद्याच्या हातुन होणारच नाही. कायदे कडक बनवून भागणार नाही. आपल्याला सर्वसामान्यांच्यी मानसिकता बदलावी लागेल. माझी सर्व माता-बहिणींना एक विनंती आहे. कृपा करुन आपल्या कपड्यांमधुन अंगप्रदर्शन करु नका. साडी-पंजाबी ड्रेस सारखी पारंपारीक कपडे वापरणं सुरु करा. कोणताही गुन्हेगार पोटातुन गुन्हेगारी शिकुन येत नाही. समाजातील स्त्री-पुरुषांच्या राहणीमानातला विभत्सपणा वाढल्याने स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजात बदलला आहे.

जीजा माता मॉडर्न होत्या त्या विचारांनी, त्यांनी शुद्धीकरण ही संकल्पना आणली व जबरस्ती मुसलमान करण्यात आलेल्या तमाम बांधवांना पुनश्च धर्मात घेतले,
क्रांती ज्योती सावित्री बाई फुले मॉडर्न विचाराच्या होत्या, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खपविले. ते ही लोकांच्या शिव्या-शाप ऐकत, लोकांनी मारलेले दगड-गोटे, शेणाचे गोळे झेलत..!
लक्ष्मीबाई मॉडर्न विचाराच्या होत्या, त्यांनी स्त्री सक्षमी करणासाठी/देश रक्षणासाठी तलवार उचलली आणि शक्तिशाली इंग्रजां विरुध्द लढल्या.
अशा मॉडर्न विचारंच्या असंख्य माता या देशात होऊन गेल्या. पण त्यांचा पदर कधी डोक्यावरुन खाली आला नव्हता. आज आमच्या मातांच्या कपड्यांना पदरच नाहीए. याला आम्ही मुलांनी मॉड्रन मानायचे का?

No comments:

Post a Comment