Showing posts with label Premachya Kavita. Show all posts
Showing posts with label Premachya Kavita. Show all posts

प्रेम हे प्रेम असतं

प्रेम हे प्रेम असत,
तुमच आमच कधीच सेम नसत.....
कधी ते एका क्षणात होत,
तर कधी पूर्ण आयुष्य कमी पडत.....
कधी न मागतच मिळत,
तर कधी मागूनही मिळत नसत.....
कधी ते हसवत,
तर कधी नकळत रडवत असत.....
प्रत्येकाला मिळत नाही कधी ते,
ते तर नशिबवानांना मिळत असत.....
कारण ???
खर प्रेम कधीच कुणाला कळत नसत.....
खर प्रेम कधीच कुणाला कळत नसत....

मागून बघ जीव ही, नाही मी म्हणणार नाही

मागून बघ जीव ही
नाही मी म्हणणार नाही

नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही
तुझा झालो तेव्हाच मी,
माझ्यासाठी संपलो होतो,
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी,
तुझ्या बरोबरच जगलो आहे
श्वासांच्या प्रत्येक स्पंदणात,
फक्त तुलाच तर जपले आहे,
मागून घे श्वासही,
नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही
तुझे माझे काय असते
कधी मला कळलेच नाही
तुझ्या शिवाय जगायचे
स्वप्न ही कधी मला पडले नाही
मागून घे स्वप्नेही
नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही
इतकेच सांगतो तुला ही
माझ्या शिवाय जमणार नाही
आणि तुझे ते तरफडणे
मी सहन करणार नाही
मागून घे अंतही
नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही