Showing posts with label Bhavanik. Show all posts
Showing posts with label Bhavanik. Show all posts

।।आई।।

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली. संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे. सकाळी लवकर उठेन. मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते, पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर, माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला; गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली. आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले,
मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने विचारले बाळा जत्रेत की की पहिले मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या मग आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे की केलेस काही खाल्लेस कि नाही,
त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी काढून आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात त्या संड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले
आई धन्य झाली.....आईच्याहाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली.

नि:स्वार्थ प्रेम

एका डॉक्‍टरांक डे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढूनघ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांन ा म्हणाले,थोडं लवकरहोईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय.डॉक्‍टरांस मोर त्या क्षणीकाहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाकेकाढायची तयारी केली.

दरम्यान, ते त्या गृ…हस्थाशी गप्पा मारत होते.“”आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांच ी अपॉइंटमेंट आहे का?”“”नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध ्ये जायचंय.”“”हॉस्पिटल मध्ये? आजारी आहेत का त्या?”“”हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध ्येच आहे ती.”“”अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील…?”“”नाही डॉक्‍टर. तिला “अल्झायमर् स’ झालाय. तीगेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.”

आजोबा शांतपणे म्हणाले.डॉक्‍टरचकित होऊन म्हणाले, “”आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याब रोबर नाश्‍ता करायलाइतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?”त्यावरपुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, “”डॉक्‍टर ती मला ओळखतनसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझंजिवापाड प्रेम आहे तिच्यावर.”ऐकता ऐकता डॉक्‍टरांच ्या अंगावररोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, “”हे खरं प्रेम;प्रेम म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं,निरपेक्षपण े स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं – त्या गृहस्थांसा रखं.”अचानक इंटरनेटवरू न आलेल्या अनेक संदेशांमधल ा एक संदेशडॉक्‍टरांन ा आठवला-“”चांगल्यालोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही – पण जेवाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.”यालाचआयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्हीहातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं…खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?. .