दारू आणि उध्वस्त संसार

गेल्या अनेक दिवसांपासून मी खुप अस्वस्थ आहे. दारू पिऊन अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या घटना आता रोजचा भाग बनला आहे. लहान वयातली कोवळी पोरांपासून वृध्दांपर्यंत दारू पिणे आता सवयांचा भाग बनलेत.
श्रीमंताने दारू पिली तर टेंशन घालवण्यासाठी पितो असं गोंडस कारण दाखवलं जात. गरीब/कष्टकर्याला पिण्याबद्दल विचारल तर तो म्हणतो, थकवा घालवण्यासाठी प्यावी लागते. दारू पिणारा देखिल एक माणूस असतो. मात्र दारू पिऊन त्यात आकंठ बुडुन संसाराची राख-रांगोळी होतांना पाहावलं जात नाही. लहान-लहान पोरांचा बाप दारु मुळे मेल्यावर त्यामुलांच्या भविष्य काय असेल या कल्पना देखिल करवत नाही. कमी वयात विधवा बनणार्या स्री ला समाजात किती वाईट अनुभव रोज येतात या बद्दल किती बोलणार?

दारू सोडण्यासाठी काही सोपा व प्रभावी उपाय माहीत असेल तर कृपया आम्हाला मॅसेज करा. या गृप तर्फे ही माहीती पोस्ट करण्यात येईल.
.

No comments:

Post a Comment